महाराष्ट्र

BMC Election 2026: मोठी बातमी : भाजप 140, शिवसेना 87, मुंबईसाठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास ठरला!

BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 जानेवारीला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. भाजप आणि शिंदे गटाच्या जागावाटपाचा फॉर्म्युला.

BMC Election 2026 BJP Shivsena Seat sharing forumula: आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. या चर्चेअंती आता भाजप आणि शिंदे सेनेच्या मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणूक 2026 (Mumbai Election 2026)  साठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून 227 जागा लढवणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा आता कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  (Mumbai seat sharing formula)

यापूर्वी जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदे गटासाठी (Shinde Camp) फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने आता शिवसेनेला जास्त जागा देऊ केल्या हाेत्या. परंतु, जागावाटपच्या या सूत्रावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Mumbai news: मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर (BMC Election Date 2026) झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.

Mumbai news: मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)

नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
मतदान- 15 जानेवारी 2026
मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

Mumbai Election:  2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक (Party Wise Corporator BMC 2017)

शिवसेना- 84
भाजपा- 82
काँग्रेस- 31
राष्ट्रवादी काँग्रेस- 9
मनसे- 7
समाजवादी पक्ष- 6
एमआयएम- 2
अपक्ष- 5

आणखी वाचा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत कोणाला किती जागा, पहिल्या सर्व्हेचा अंदाज समोर, राज-उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?

मोठी बातमी: राज ठाकरे-उद्धव ठाकरेंच्या युतीच्या घोषणेपूर्वीच ठाकरे गटाचा पहिला उमेदवार ठरला, मनसे-शिवसेना युती 130 जागा जिंकण्याचा अंदाज, किशोरी पेडणेकरांचा दावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!